खराडीच्या रक्षक नगर गोल्ड सोसायटीमध्ये नोवो सॉलिटेअर फाऊंडेशनने 26 जानेवारी रोजी सामाजिक जागरुकतेसाठी एक मोफत सीपीआर (कार्डियो पल्मोनरी रिससिटेशन) ट्रेनिंग कॅम्प आयोजित केला होता. या कॅम्पचा उद्देश नागरिकांना जीव वाचवण्यासाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या कौशल्यांचे प्रशिक्षण देणे आणि आपत्कालीन परिस्थितींमध्ये योग्य प्रतिसाद कसा द्यावा हे शिकवणे हा होता.
नोवो सॉलिटेअर फाऊंडेशनचे संचालक डॉ. अनिकेत मोहिते (हॅमॅटो-ऑंकोलॉजिस्ट) आणि डॉ. शरयू मोहिते (आईव्हीएफ तज्ज्ञ व स्त्रीरोगतज्ज्ञ) हे समाजातील आरोग्य सेवांबद्दल अत्यंत संवेदनशील आणि समर्पित आहेत. रुग्णांप्रती त्यांचा दयाळूपणा आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव त्यांना इतरांपेक्षा वेगळं सिद्ध करते. त्यांनी त्यांच्या दैनंदिन व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून या कॅम्पमध्ये उपस्थित राहणे, लोकांना मार्गदर्शन करणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे ही त्यांची सेवाभावी वृत्ती अधोरेखित करते..
या कॅम्पमध्ये त्यांनी सीपीआरचे महत्त्व पटवून दिले आणि अशा आपत्कालीन कौशल्यांमुळे प्रत्येक सामान्य माणूस गरजेच्या वेळी जीव वाचवणारा ठरू शकतो, हे अधोरेखित केले. नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करताना त्यांनी सहभागींना ₹1,000 किमतीचे कूपन देऊन त्यांच्या किमती वेळेसाठी आदर व्यक्त केला.
डॉ. अनिकेत आणि डॉ. शरयू केवळ 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या दिवशीच नव्हे, तर महिलादिन, जागतिक आरोग्यदिन, आणि इतर महत्त्वाच्या दिवसांवरही अशा प्रकारचे उपक्रम राबवतात. समाजाच्या आरोग्याशी संबंधित प्रत्येक गोष्ट त्यांच्या प्राधान्यक्रमात असते.
Mahaxpress टीमकडून डॉ. अनिकेत आणि डॉ. शरयू मोहिते यांना मनःपूर्वक शुभेच्छा. भविष्यात अशाच सामाजिक उपक्रमांची अपेक्षा आहे.
Tags : Dr Sharayu Mohite, Dr Sharayu Mohite, Dr Sharayu Mohite