पुस्तक प्रकाशन सोहळ्याचा वृत्तांत:
“होप फॉर मायलोमा: अवेरनेस अँड रेझिलन्स” – रक्ताच्या कर्करोगावरील जागृतीचे पुस्तक
पुणे, १५ जानेवारी २०२५: ब्लड कॅन्सर आणि इतर रक्तविकारांवर सखोल माहिती व जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने, डॉ. अनिकेत मोहिते (MBBS, MD, DM – हेमॅटोलॉजिस्ट) यांनी “होप फॉर मायलोमा: अवेरनेस अँड रेझिलन्स” हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज पुण्यातील पत्रकार भवन, नवी पेठ येथे उत्साहात पार पडला.
पुस्तकाची वैशिष्ट्ये:
ब्लड कॅन्सर आणि तत्सम गंभीर आजारांविषयी सर्वसामान्य लोकांना योग्य माहिती मिळावी, तसेच उपचार प्रक्रियेबद्दल सखोल समज यावी, यासाठी या पुस्तकामध्ये विविध विषयांचा समावेश केला आहे.
- रक्ताच्या कर्करोगाशी कसा सामना करावा?
- योग्य औषधे आणि त्यांचे उपयोग.
- आजारावरील उपचार पद्धती आणि जीवनशैलीतील बदल.
- घरी राहून आरोग्याची काळजी कशी घ्यावी?
डॉ. मोहिते यांनी वैद्यकीय क्षेत्रातील आपल्या दीर्घ अनुभवावर आधारित साध्या व सोप्या भाषेत हे पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक केवळ रुग्णांसाठीच नव्हे, तर त्यांचे कुटुंबीय, आरोग्य सेवा देणारे कर्मचारी आणि इच्छुक वाचकांसाठीही मार्गदर्शक ठरेल.
कार्यक्रमाची वैशिष्ट्ये:
पुस्तक प्रकाशन सोहळ्याला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांनी डॉ. मोहिते यांच्या योगदानाचे कौतुक केले आणि ब्लड कॅन्सरविषयी जागरुकतेची गरज अधोरेखित केली.
डॉ. अनिकेत मोहिते यांची बाइट:
“ब्लड कॅन्सर आणि त्यासंबंधित आजार रुग्णांसाठी खूप आव्हानात्मक असतात. परंतु, योग्य माहिती आणि सकारात्मक दृष्टिकोनामुळे आपण या आजारांना हरवू शकतो. हे पुस्तक वाचकांसाठी प्रेरणादायी व माहितीपूर्ण ठरेल, याची मला खात्री आहे.”
कार्यक्रमाची वेळ व स्थळ:
- स्थळ: पत्रकार भवन, गणजवे चौक, नवी पेठ, पुणे ४११०३०
- वेळ: १५ जानेवारी २०२५, दुपारी १२ वाजता
ISBN क्रमांक:
या पुस्तकाचा ISBN क्रमांक 978-93-341-7754-1 आहे.
डॉ. अनिकेत मोहिते यांनी आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करण्यासाठी घेतलेले हे पाऊल समाजासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरेल, यात शंका नाही.
अधिक माहिती साठी www.novosolitaire.com वर भेट दया.