परभणीतील दोन पोलिसांना दोन संशयितांना घेऊन कोर्टात पोहचायचं होतं, मात्रत्यांना पोहचण्यास अर्धा तास उशिरा झाल्यानं, दंडाधिकाऱ्यांनी त्यांना गवत कापण्याची शिक्षा सुनावली.
परभणी : कार्यालयात उशीर येण्यामुळे बॉसकडून कर्मचाऱ्यांना शिक्षा मिळण्याचे प्रकार काही नवीन नव्हतं. उशीरा येण्याबद्दल कुणाचा पगार काप जातो किंवा कधी कुणाचा लेट मार्क लावला जातो. मात्र, कधी कुणाला उशीरा येण्याबद्दल गवत कापण्याची शिक्षा मिळाल्याचे ऐकलं: का? परभणीमध्ये हा विचित्र प्रकार घडला आहे. संशयित आरोपींना उशीर न्यायालयात घेऊन आल्याने न्यायाधिशांनी दोन पोलिसांना च गवत कापण्याची शिक्षा (The judge sentenced to cut grass) दिली. नेमका काय आहे प्रकारबघा नेमके काय घडलं.
परभणी येथील मानवत पोलीस स्टेशनचे हवालदार आणि हेड कॉन्स्टेबलला यांनी 22 ऑक्टोबर रात्री गस्तीदरम्यान संशयास्पद स्थितीत फिरत असलेल्या दोघांना पकडले होते. दोघांनाही दुसया दिवशी सकाळी 11 वाजता न्यायालयात हजर करण्यात येणार होतेमात्रत्यांनना आरोपींना न्यायालयात घेऊन पोहचण्यास अर्धा तास उशीर झाला. त्यामुळे संतप्त झालेल्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी त्यांना गवत कापण्याचे काम दिले. मात्रया शिक्षेने दोन्ही पोलीस कर्मचारी संतप्त असल्याचे बोलले जात आहे, या प्रकरणाची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकान्यांनाही देण्यात आली आहे.
प्रकरण महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील आहे. येथे मानवत पोलिस ठाण्याच्या एका हवालदार आणि हेड कॉन्स्टेबलला गवत कापल्याप्रकरणी शिक्षा झाली. या शिक्षेमुळे संतप्त झालेल्या दोन्ही पोलिस कर्मचान्यांनी आपल्या अधिकायांना या प्रकरणाची माहिती दिली आहे. मीडिया रिपोर्टमध्येपरभणी एसपी प्रभारी यांच्या हवाल्याने सांगितले जात आहे कीयोग्य कारवाईसाठी सविस्तर अहवाल न्यायव्यवस्थेकडे पाठवण्यात आला आहे.