पुणे हादरले! बस स्थानकातील अमानवीय कृत्याने संतापाची लाट
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे (Dattatray Gade) याला पुणे पोलिसांनी अखेर अटक केली. विशेष म्हणजे, पोलिसांपासून लपण्यासाठी तो ऊसाच्या शेतात दडून बसला होता आणि तिथेच त्याने तीन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी दोरी तुटल्याने त्याचा प्रयत्न फसला.
पोलिसांनी ४८ तासांत लावला छडा
या प्रकरणाची गंभीर दखल घेत, पुणे पोलिसांनी मोठ्या शोधमोहीमेनंतर गाडेला पकडले. ऊसाच्या शेतात लपून बसलेल्या आरोपीला शोधण्यासाठी ड्रोन कॅमेरे, शोध दिवे आणि १०० हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. अखेर गुनाट (ता. शिरूर, जि. पुणे) येथील एका शेतात त्याला अटक करण्यात आली.
गुनाहगार की निर्दोष? आरोपीची बाजू
अटकेनंतर गाडेला न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांनी १४ दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली, मात्र त्याच्या वकिलांनी दावा केला की, हा बलात्काराचा नाही तर संमतीने झालेला प्रकार आहे. मात्र, प्राथमिक तपासातून पीडितेवर जबरदस्तीचा पुरावा सापडला आहे, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
📢 ताज्या बातम्या:
- बॉलिवूडमध्ये आनंदाची लाट – कियारा अडवाणी आणि अथिया शेट्टी लवकरच आई बनणार! Kiara Advani
- विकी कौशलच्या (Vicky Kaushal) ‘छावा’ने (Chhaava) जागतिक स्तरावर आपली ताकद दाखवली!
- विकी कौशलच्या ‘छावा’चा बॉक्स ऑफिसवर जलवा – १५ दिवसांत ४०० कोटींच्या पार! Vicky Kaushal
- रवीना टंडन (Raveena Tandon) यांनी उघड केला आपल्या दत्तक मुलींसोबतचा अनुभव – “पूर्ण वेडसरपणा होता!”
- आलिया भट्टचा खास खुलासा: आईच्या जुन्या रेसिपीज राहासाठी पुन्हा वापरात Alia Bhut
1 Comment
याला फाशी ची शिक्षा झाली पहिजे